आजकाल च्या धावपळीच्या जीवन मध्ये इमानदारी आणि प्रामाणिकपणा हे फक्त बोलायचे शब्द वाटतात पण काही लोकं मध्ये अजून पण इमानदारी जिवंत आहे ..नुकतेच मुंबई मध्ये ह्याचा प्रत्यय आला एका ऑटोवाल्या ने त्याच्या ग्राहकाचे ३ लाख रुपये चा बॅग त्यांच्या पर्यंत पोहोचवले..समता नगर पोलीस स्टेशन अनुसार एक जोडपे ऑटोमध्ये बसले आणि मध्ये मोबाईल गेल्लेरी बघून मोबाईल घ्यायला उतरले आणि त्यांची ३ लाख रुपये असलेली बॅग ऑटोमध्येच राहिली ..ऑटोवाल्याच्या लक्ष्यात आल्या वर त्याने त्या जोडप्याला जिथे उतरवले होते ते तिथे गेले पण तिथे ते दिसले नाही मग तो ऑटोवाला तिथे गेला जिथून ते जोडपे त्याच्या रिक्षा मध्ये बसले होते तिथून त्यांना शोधून त्याने त्यांचे पैसे परत केले..आजच्या काळात ३ लाख रुपये खूप मोठी रक्कम असून ऑटोवाल्याच्या प्रामाणिक पण मुळे ग्राहकाला पैसे त्यांना परत मिळाले.